शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

वाद वाढण्यापूर्वीच पुतळ्याला निळा रंग दिला

उत्तरप्रदेशमधील बदायूच्या कुवरगाव येथे काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर बसवण्यात आलेल्या नव्या पुतळ्याला निळा रंग देण्याऐवजी भगवा रंग दिल्याने वाद निर्माण झाला. विरोधकांनी याचे राजकारण करण योगी सरकारला धारेवर धरले. परंतु वाद वाढण्यापूर्वीच पुतळ्याला निळा रंग देण्यात आल्याने वातावरण निवळले. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष हेमेंद्र कुमार गौतम यांच्या सांगण्यावरून बाबासाहेबांच्या पुतळ्याला भगवा रंग देण्यात आला होता. दोन समाजामधील तेढ कमी होण्यासाठी आपण आग्रा येथून भगवा पुतळा आणल्याचे त्यांनी सांगितले. यामागे कोणतेही कारस्थान नसल्याचे त्यांनी एक पत्र जारी करत सांगितले आहे.