बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बिकनीत सनी करतेय शेतीचे रक्षण

हैदराबाद- आंध्र प्रदेशच्या एका शेतकर्‍याने पीकांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी शेतात सनी लिओनीची बिकीनी घातलेली फोटो लावली आहे. हे विचित्र प्रकरण नेल्लोर जिल्ह्यातील बांदाकिंदिपल्ली गावाचे आहे. ए.चेंचू रेड्डी असे या शेतकर्‍याचे नाव आहे. याने एक नव्हे तर सनी लिओनीचे बिकनी घातलेले दोन फोटो शेतात लावले आहेत. या पोस्टरवर तेलुगूमध्ये लिहिले आहे... माझ्यावर जळू नका.
 
शेतकर्‍याप्रमाणे अनेक वर्षांपासून त्याचे अनेक टोटके केले तरी पिक खराब होत होते. लोकांना सनी लिओनी पसंत आहे म्हणून लोकांचे लक्ष आता माझ्या शेतीकडे नसून सनीच्या पोस्टरवर असणार ज्याने शेताची वाईट नजरेपासून रक्षण होईल. आपल्या मित्राच्या सल्ल्यावर लावलेल्या या पोस्टरमुळे रेड्डी चर्चेत आहेत.