मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

रात्रभरात गायब झालं 100 वर्ष जुनं वडाचं झाड

बेंगलुरू येथे विचित्र घटनेत मात्र एका रात्रीत सुमारे 100 वर्ष जुनं वडाचं झाडं गायब झाले आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
 
हे झाडं कुणी कापले असावं असं वाटतं असलं तरी येथील रहिवाशांप्रमाणे एका रात्रीत असे करणे असंभव आहे कारण झाडं शंभर वर्ष जुनं आणि खूप मोठं होतं. जेव्हा लोकांना झाड नसल्याचं कळलं तर आरोपीचा शोध सुरू झाला तरी यश काही हाती लागलं नाही नंतर पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करण्यात आली.
 
या घटनेत वेगवेगळ्या लोकांवर शंका घेतली जात आहे. पोलिसांप्रमाणे शोध सुरू असून असी घटना पुन्हा घडू नये म्हणून स्थानिक लोकांनी झाडांवर खूण करायला सरुवात केली आहे. अश्या झाडांवर खूण केली जात आहे जे इमारती निर्माणात अडचण ठरू शकतात आणि त्यांच्या कापल्या जाण्याची शक्यता जास्त आहे.