गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (15:04 IST)

परीक्षेसाठी 500 मुलींमध्ये स्वतःला एकटा पाहून मुलगा बेशुद्ध पडला

बिहारमधील नालंदामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जिथे 12वीचा एक विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये 500 विद्यार्थिनींमध्ये एकटा असल्यामुळे घाबरुन बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 
500 मुलींमध्ये स्वतःला एकटा पाहून मुलगा बेशुद्ध पडला
बिहार शरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजचा एक विद्यार्थी मणिशंकर ब्रिलियंट स्कूलमध्ये त्याच्या 12वीच्या बोर्डाची परीक्षा देण्यासाठी आला होता. आणि ज्या परीक्षा केंद्रावर तो पोहोचला, तिथे 500 मुलींमध्ये तो एकटाच मुलगा होता. हे कळताच तो घाबरला आणि नंतर बेशुद्ध पडला. नौबत रुग्णालयात दाखल करण्याच्या अवस्थेत पोहोचली. विद्यार्थ्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की अस्वस्थतेमुळे तो बेशुद्ध पडला. त्याला ताप आला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जेव्हा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर गेला तेव्हा ती खोली मुलींनी भरलेली दिसली, ज्यामुळे तो घाबरला आणि ताप आला. या विद्यार्थ्याला उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
 
बिहारमध्ये 1 फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. यासाठी राज्यात 1464 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यावेळी एकूण 13 लाख 18 हजार 227 विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेला बसले आहेत. यामध्ये 6 लाख 36 हजार 432 मुली आणि 6 लाख 81 हजार 795 मुले आहेत. बिहार शाळा परीक्षा मंडळ ही परीक्षा घेत आहे.