सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुजरात, 30 सप्टेंबर: , गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (10:21 IST)

लीलावती हॉस्पिटलच्या ट्रस्टी चे 45 कोटींचे दागिने चोरी

45 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची कथित चोरी झाल्याची तक्रार गुजरात उच्च न्यायालयात (Gujarat High Court) दाखल झाली आहे. या तक्रारीनंतर पालनपूरमधील पोलीस या प्रकरणाची नोंद करण्यात अपयशी ठरलेत. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलच्या ट्रस्टीच्या मुलांपैकी एक प्रशांत किशोर मेहता (Prashant Kishor Mehta) यांनी ही याचिका दाखल केली आहे.
 
काय आहे नेमकं प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, मेहता यांच्या आजोबांनी खूप वर्षांपूर्वी बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये गरिबांसाठी मणी भूवन हे धर्मादाय रुग्णालय बांधलं होतं. या रुग्णालयाच्या इमारतीत एक सुरक्षित तिजोरी होती ज्यात मेहताच्या आजोबांनी कोट्यवधी रुपयांची मौल्यवान वस्तू ठेवली होती.
 
त्यावर याचिकादारानं आरोप केला की, इमारतीच्या केअरटेकर्सनी सुरक्षित असलेली तिजोरी फोडली आणि 2019 मध्ये इमारतीचं नूतनीकरण होत असताना 45 कोटी रुपयांचे साहित्य चोरी केलं. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून लीलावती रुग्णालयालाही भेट दिली. मात्र काही कारणास्तव, चौकशी कथितपणे बंद करण्यात आली.