शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (17:43 IST)

मुख्यमंत्री योगी यांनी बरसाना येथे राधाराणी चे दर्शन केले

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मथुरा दौऱ्यावर आहेत. योगी मंगळवारी सकाळी श्रीकृष्ण जन्मस्थानी दर्शनासाठी पोहोचले. येथे त्यांनी गर्भगृह, ठाकूर केशव देव मंदिर, योगमाया मंदिराला भेट दिली. मुख्यमंत्री सुमारे 15 मिनिटे येथे थांबले. यानंतर जन्मभूमी आवारातील भागवत भवनात गेले. तेथे त्यांनी राधा-कृष्णाची पूजा केली.नंतर त्यांनी बरसाना येथे राधारांनी मंदिरात जाऊन सकाळी पूजा केली.
यानंतर ते गोकुळमार्गे रासखानच्या समाधीवर गेले. येथे त्यांनी ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या विकासकामांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या 5 व्या बोर्ड मिटिंगला हजेरी लावली. यासोबतच मथुरेत सुरू असलेली विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.