उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्लीतही सुट्ट्या रद्द
उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे दिल्लीतील आप सरकारने सुद्धा महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात आदेश दिले आहेत.
यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. दिल्ली सरकार इतर राज्यांकडून शिकण्यासाठी नेहमीच तयार आहे.