सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2016 (17:02 IST)

'ऐ दिल है मुष्किल' वाद संपुष्टात आला!

चित्रपट 'ऐ दिल है मुष्किल'च्या रिलीजवर उठलेले विवादांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निर्माता करण जौहर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या शनिवारी भेट झाली.   
फिल्म प्रोड्यूसर्स गिल्डचे अध्यक्ष मुकेश भट देखील या भेटीत सामील होते.  
एमएनएस प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले की 'ऐ दिल है मुष्किल'च्या रिलीज बद्दल विरोध परत घेतो.  
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या बैठकीनंतर प्रेस वार्तेत सांगितले की त्यांनी या बैठकीत तीन मागण्या ठेवल्या आहेत.  
 
त्यांच्यानुसार, ''एमएनएसची पहिली मागणी आहे की चित्रपटाच्या सुरुवातीत उरी आणि या आधी झालेल्या शहिदांना श्रद्धांजली संदेश दिला जाईल. दुसरी मागणी अशी आहे की चित्रपट निर्मात्याने लिखितामध्ये दिले पाहिजे की भविष्यात पाकिस्तानी कलाकारांसोबत काम नाही करणार. आणि तिसरी पाकिस्तानी कलाकारांना घेणार्‍या निर्मात्यांना सेना वेलफ़ेयर फंडमध्ये पाच कोटी रुपये दिले पाहिजे."
 
राज ठाकरे यांनी म्हटले, ''आजपर्यंत बरेच बॉम्बं हल्ले झाले, मुकेश भट्ट आणि करण जौहर यांना मी म्हटले की पाकिस्तानात ते तुमचे चित्रपट, तुमच्या सामुग्रीवर रोख लावतात तर तुम्ही पाकिस्तानी कलाकारांसाठी रेड कार्पेट पसरवता.''
तसेच मुकेश भट्ट बैठकीनंतर म्हणाले की, ''बैठक सकारात्मक झाली. मीपण फिल्म इंडस्ट्रीची भावनांचा आदर केला असून आम्ही आधी भारतीय आहोत, आमच्यासाठी भारतीय संवेदना सर्वात जास्त महत्त्वाच्या आहे. राज ठाकरेपण या बैठकीत सामील होते. लोक, सैनिक आणि संपूर्ण देशाच्या भावनांचा मान राखून गिल्डने हा निर्णय घेतला आहे की आम्ही पाकिस्तानी कलाकारांसोबत काम नाही करणार.  आम्ही गिल्डची बैठक बसवून या प्रस्तावाला मंजुरी देऊ.''
 
त्यांनी म्हटले, ''करण जौहर यांनी प्रस्ताव ठेवला आहे की ते उरीच्या शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक संदेश चित्रपट सुरू होण्याअगोदर दाखवेल. तो चित्रपटाच्या सुरुवातीत आपल्या वडिलांना श्रद्धांजली देण्याअगोदर शहिदांना श्रद्धांजली देईल.''
नुकतेच भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अशी मागणी आली होती की बॉलीवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना काम नाही मिळायला पाहिजे.  
चित्रपट 'ऐ दिल है मुष्किल' पाकिस्तानी अभिनेता फ़वाद ख़ानला घेऊन विवादात अडकली होती.  
 
भट्ट यांनी म्हटले चित्रपट आपली ठरलेली तारीख अर्थात 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होईल.  
मुकेश भट्ट यांच्यानुसार चित्रपट चालो अथवा ना चालो सेनेच्या वेलफ़ेयर फंडमध्ये देखील करण जौहर आणि इतर निर्मात्यांनी योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.   
त्यांनी सांगितले, ''यासाठी कुणावर काहीही दबाव नव्हता, हा निर्णय स्वेच्छेने घेतलेला आहे.''
त्यांनी म्हटले, आता पूर्ण विवाद संपुष्टात आला आहे. चरमपंथमुळे एका भारतीयाचा दुसर्‍या भारतीयाशी जो विवाद  झाला होता तो आता संपला आहे. आता ए दिल है मुष्किल आपल्या निर्धारित वेळेतच रिलीज होईल. आम्ही सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. ''