बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 मार्च 2018 (11:35 IST)

फरहान अख्तर नीरव मोदीचे 'रिदम हाऊस' विकत घेणार

पीएनबीमध्ये ११ हजार कोटींचा घोटाळा करून परदेशात पोबारा केलेला नीरव मोदीचं घर अभिनेता  फरहान अख्तरला खरेदी करायचं आहे. कारण फरहान अख्‍तरला होतकरु संगीतकारांसाठी एक व्‍यासपीठ असावे असे वाटते. म्‍हणून फरहानने निरव मोदींचे रिदम हाऊस घेणार आहे. त्‍याने सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून नीरव मोदीची प्रॉपर्टी असलेले कोलाबा येथील रिदम हाऊस संगीतकारांसाठी रिस्टोर करण्‍याचे सांगितले आहे. या घरात छोट्‍या-मोठ्‍या संगीतकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्‍यासपीठावर तयार करायचे आहे. तसेच त्याला या ठीकाणी संगीताची आवड असलेल्यांसाठी हँगआऊट प्लेस तयार करायची आहे.

दरम्‍यान, आनंद महिंद्रा यांनी एका उपक्रमाची घोषणा केली होती. या उपक्रमांतर्गत आनंद यांनी सोशल मीडियावर म्‍हटले होते की, जर ईडीने ही प्रॉपर्टी लिलाव करायचयं ठरवलं तर मुंर्बतील काही जण मिळून या घरासाठी प्रयत्‍न करू आणि संगीतकारांसाठी एक व्‍यासपीठ म्‍हणून ओळख निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करू.  यानंतर फरहानने ट्‍विटवर लिहिले की, या मिशनमध्‍ये मी सहभागी झालो तर यामुळे मला आनंद होईल @anandmahindra #rhythmhouse.