सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

Last Modified गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (09:55 IST)
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, जीवनास कंटाळून पुढील प्रवासास जात असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे.
अश्विनी कुमार यांच्या मृत्यूबाबत वृत्त कळताच हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू, सिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकही दाखल झाले. कुंडू यांनी सांगितले की, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे. अश्विनी कुमार हे त्यांच्या खोलीत गेले, आतून दार लावले व नायलॉनच्या दोरीने आत्महत्या केली. या वेळी त्यांचे कुटुंबीय घरातच होते. या घटनेत काही घातपात असण्याची शक्यता कुटुंबीयांना वाटत नाही. गुरुवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.
एरव्ही अत्यंत कार्यमग्न असलेले अश्विनीकुमार यांना मागील सहा महिन्यांपासून घरातच राहावे लागत असल्याने बदललेल्या जीवनशैलीमुळे नैराश्य येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरीही पोलीस इतर शक्यता लक्षात घेऊन तपास करीत आहेत.
त्यांच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, अश्विनी कुमार हे आज सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. घरी परतल्यावर ते घराच्या वरच्या मजल्यावर गेले होते.
अरुषी तलवार खून प्रकरण खूप गाजत असताना २००८ मध्ये ते सीबीआयचे संचालक झाले होते. मार्च २०१३ ते जून २०१४ पर्यंत ते नागालँडचे राज्यपाल होते. २०१३मध्ये काही काळासाठी ते मणिपूरचे राज्यपाल होते. ऑगस्ट २००६ पासून जुलै २००८ या कालावधीत ते हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. २ आॅगस्ट २००८ ते ३० नोव्हेंबर २०१० या कालावधीत ते सीबीआयचे संचालक होते. सध्या ते सिमला येथील खाजगी विद्यापीठाचे कुलगुरू होते. ते १९७३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. १९८५मध्ये त्यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये (एसपीजी) नेमणूक केली होती. १९८५ ते १९९० पर्यंत त्यांनी विविध पदांवर काम केले. पीएमओमध्ये सहायक संचालक पदावरही त्यांनी काम केले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

लग्नाच्या 5 दिवसानंतर वधूचा कोरोनामुळे मृत्यू झाला

लग्नाच्या 5 दिवसानंतर वधूचा कोरोनामुळे मृत्यू झाला
केंद्रपाडा- ओडिशाच्या केन्द्रापाडा जिल्ह्यात कोविड -19 मुळे एका 26 वर्षीय व्यक्तीचा ...

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का ...

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का पाठविली गेली? मला देखील अटक करा
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पोस्टर्स चिकटविण्याच्या आणि त्यानंतर पोलिसांनी लोकांना अटक ...

कोरोना पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या साठी ...

कोरोना पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या साठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली. केंद्र आणि राज्य सरकारांना कोरोनाव्हायरस कोविड -19 मध्ये मृत्यू झालेल्यांच्या ...

भारतात कोरोनाच्या एकूण किती लस आहे जाणून घ्या

भारतात कोरोनाच्या एकूण किती लस आहे जाणून घ्या
कोरोना विषाणूची दुसरी लाट इतकी भयानक असेल याची कोणालाही कल्पनाही नव्हती. हा अदृश्य ...

कोरोना: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्टर ...

कोरोना: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्टर लावल्याने 15जण अटकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोस्टर्स लावल्याप्रकरणी राजधानी दिल्लीत ...