शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 20 मार्च 2019 (16:58 IST)

निरव मोदीला लंडनमध्ये अटक

भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त अर्थात 13 हजार कोटींचा घोटाळा करणार्‍या ‍निरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. बँकांना करोडो रुपयांचा गंडा घालून नीरव मोदी भारतातून फरार झाला होता.
 
भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले होते आणि याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018 च्या जुलै महिन्यात निरव मोदीच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती. दरम्यान, काही पत्रकरांना निरव मोदी लंडनमध्ये दिसला होता त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. 
 
निरव मोदीला लवकरच भारताकडे सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.