बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दुष्कर्म प्रकरणात आसारामचा बापूचा मुलगा दोषी

सुरत- न्यायालयाने 2013 मध्ये घडलेल्या दुष्कर्म प्रकरणात नारायण साईला दोषी ठरवले आहे. आसाराम बापूचा मुलगा नारायण साईवर सुरत येथे राहणार्‍या दोन सख्ख्या बहिणींवर दुष्कर्माचा आरोप आहे.
 
आता ३० एप्रिल रोजी सत्र न्यायालय नारायण साईला शिक्षा सुनावणार आहे. नारायणाचा सहकारी गंगा, जमुना आणि हनुमान हे देखील यामध्ये दोषी ठरवण्यात आले आहेत. 
 
या प्रकरणी ऑक्टोबर 2013 मध्ये दुष्कर्म, शोषण, अनैतिक संबंध बनवणे आणि इतर आरोपात तक्रार नोंदवण्यात आली होती. 2002 ते 2005 पर्यंत आपल्यावर सलग शोषण केल्याचा आरोप लहान बहिणीने लावला होता.