सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (22:39 IST)

लखनौच्या हॉटेल सॅव्ही ग्रँडला भीषण आग, चार अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विभूती खांड येथील हॉटेल सॅव्ही ग्रँडच्या तळघरात बुधवारी आग लागली. तळघरातील आग मोठी होती. हॉटेलचे तळघर आगीच्या भट्टीसारखे वाटत होते. तळघरातून आगीच्या ज्वाळा निघत होत्या.आजूबाजूला काळ्या धुराचे लोट पसरले होते. यावेळी लोक इकडे-तिकडे धावताना दिसले. हॉटेल परिसरात गोंधळाचे वातावरण होते. हॉटेलच्या तळघरात लागलेल्या आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.काही लोक त्यांच्या मोबाईलवरून या घटनेचा व्हिडिओ बनवतानाही दिसले. यावेळी हॉटेलच्या बेसमेंटजवळ उभ्या असलेल्या कारला 5 ते 6 जण धक्काबुक्की करून हटवताना दिसले. त्यामुळे तिथे हॉटेलला लागून असलेल्या रस्त्यावर आग पाहणाऱ्यांची गर्दी जमली. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या मागवण्यात आल्या आहेत. अग्निशमन दल आणि स्थानिक लोक व्यस्त आहेत.

हॉटेलचा पहिला मजला पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. मात्र, दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट जास्त असल्याने अग्निशमन दलाला अडचणी येत आहेत.अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर सतत पाण्याचा वर्षाव केला. त्यानंतर सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आग कशामुळे लागली हे सध्या समजू शकलेले नाही.