शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (09:43 IST)

प्रसिद्ध मॉलला कागदी पिशवीसाठी 10 रुपये आकारणे पडले महाग, 15 हजार रुपये दंड

मॉलमधून वस्तू खरेदी केल्यावर पिशवीच्या नावावर अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. बर्‍याच दुकानात हजारो रुपयांची खरेदी केल्यावरही कागदी पिशवीच्या नावाने अतिरिक्त बिल आकारतात. अशात आपली फसवणूक होत असल्याचे जाणवल्यामुळे एका ग्राहकाने थेट ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे धाव घेतली तर हैदराबादच्या एका प्रसिद्ध मॉलला 15 हजार रुपये दंड भोगावा लागला.
 
मिळालेल्या वृत्तानुसार हैदराबाद सेंटर मॉलमध्ये एका कागदाच्या पिशवीमागे 10 रुपये आकारणे महागात पडले. ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून 15 हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक विवाद निवारण आयोगने दिले आहे. या मॉलमध्ये पिशवीसाठी 10 रुपये वेगळ्याने आकाराले जातात ज्यावर मॉलच्या नावाचा लोगो आहे.
 
कावडीगुडा रहिवासी व्ही. बज्जम यांनी याप्रकरणी ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी मॉलच्या एका दुकानातून 1400 रुपयांचा शर्ट खरेदी केला होता. तेव्हा दुकानाकडून मॉलच्या नावाचा लोगो असलेली कागदी पिशवी देण्यात आली आणि यासाठी त्यांच्याकडून 10 रुपये आकारण्यात आले. तेव्हा लोगो असलेल्या कागदी पिशवीमागे 10 रुपये आकारणे हे बेकायदेशीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार दाखल केली. तेव्हा आयोगाने मॉलला नुकसान भरपाई म्हणून त्यांना 15 हजार रुपये देण्यास सांगितले आहे.