रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (10:16 IST)

पेट्रोल ऐवजी पाइपमधून किंग कोब्रा निघाला

कोब्रा सापाचं नाव घेतलं तरी अंगाचा थरकाप होतो. जगातील सर्वात विषारी प्रजातीमध्ये कोब्रा सापाचा समावेश आहे. कोब्राचा दंश झाल्यावर काही क्षणातच व्यक्तीचा जीव जातो. पण ओडीसातील मयूरभंज येथे घडलेल्या एका विचित्र घटनेत पेट्रोल पंपच्या पाइपमधून पेट्रोलऐजवी कोब्रा बाहेर पडला.
 
येथे पेट्रोलच्या नळीत कोब्रा जावून बसला होता. या कोब्राला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढून जंगलात सोडलं आहे.
 
क्रोबा स्टीलच्या पाईपमध्ये फसला होता. वरून केवळ त्याचं तोंड दिसत होतं. तो सतत जीभ बाहेर काढून फुस् असा आवाज काढत होता. नंतर त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून जंगलात सोडण्यात आलं.