गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लालू प्रसाद यादव यांच्या २२ ठिकाणांवर आयकर छापे

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. हे छापे  दिल्ली आणि गुडगाव येथे टाकले आहेत.

आयकर विभाग मंगळवारी  सकाळी 8.30 च्या पासून कारवाई करत आहे. एक हजार कोटींच्या बेनामी संपत्ती प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासह खासदार प्रेमचंद गुप्ता यांच्या मुलांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.