शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (18:01 IST)

Kashmir : धक्कादायक !एका तरुणीच 27 तरूणांशी लग्न

जम्मू-काश्मीरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे एक-दोन नव्हे तर तब्बल 27 पुरुषांना एकाच महिलेने 'बनावट लग्न' करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे .ही तरुणी सोने आणि पैसे लुटून फरार व्हायची. सदर घटना बड़गाम जिल्ह्यातील आहे. तरुणीने 27 तरुणांशी लग्न केल्याची घटना उघडकीस आली. श्रीनगरच्या लालचौक मधील प्रेस कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांनी दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस झाला.
या तरुणीं ने 27 जणांकडून  सोने आणि पैसे लुटले आहे. 

ही तरुणी लग्न करायची आणि नंतर माहेरी जाते ऐसे सांगून निघून जायची अणि परत येत नसायची.
महिला जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील राहणारी आहे. या महिलेसोबत 
संपूर्ण नेटवर्क काम करते. या फसवणुकीला बळी पडलेल्या बड़गाम खान साहिब भागात राहणाऱ्या एका व्यक्तिने सांगितले की काही महिन्यांपूर्वी एक माचिस निर्माता त्याच्याकडे आला आणि त्याने महिलेचा फोटो दाखवला. त्याने त्या व्यक्तीचा प्रस्ताव स्वीकार केला. नंतर त्याला फसवणूक झाल्याचे समजले. 
 
एका अन्य व्यक्तिने सांगितले की, सदर व्यक्तिने त्याच्या कडून दोन लाख रूपये घेतले. 
नंतर मुलाचे लग्न एका तरुणीशी लावून देण्याचे आश्वासन दिले नंतर पैसे परत मागितल्यावर तरुणीचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. त्याने राजौरीच्या तरुणीचे फोटो दाखवले. नंतर त्यांचे लग्न झाले आणि काही दिवसानंतर तरुणी डॉक्टर कड़े जाते असे सांगून तरुणाला बरोबर नेले अणि तिथुन ती पसार झाली. 

तरुणी आणि तिच्या गटाच्या लोकांनी सर्व पत्ते आणि दिलेली माहिती चुकीची आहे. सादर केलेली कागदपत्रे देखील बनावट असल्याची समजले आहे. तरुणीच्या विरोधात अनेक कुटुंबियांनी बड़गाम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे.  
 


Edited By - Priya Dixit