रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2017 (12:17 IST)

अखेर लालू कायदेशीररीत्या अडचणीत, गुन्हे दाखल

चारा घोटाळा आणि इतर आर्थिक घोटाळ्यात गुंतलेल्या लालू प्रसाद यादव विरोधात अखेर कारवाईला सुरुवात झाली आहे. यामध्ये सीबीआयने यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली आहे. सदरची कारवाई करत सुरु करत असताना  यादव यांच्यासह पत्नी राबडी देवी, मुलं आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे इतक्या दिवस वाचणारे लालू आता अडचणीत सापडले आहेत. यामध्ये केंद्रात सत्तेत असतानान लालूप्रसाद यादव 2006 साली रेल्वेमंत्रीपदी रुजू झाले होते. रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरीमधल्या हॉटेल्सना निविदा देताना केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर छापेमारी करण्यात आली आहे..दिल्ली, रांची, पुरी, पाटणा, गुरुग्राम यासारख्या 12 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. तर या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर अनेक अधिकारी आणि हॉटेल चालक आणि निवेदा भरणारे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले आहे.