मोठा अपघात: सैन्यदलाचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मिरात कोसळले ,दोघे जखमी

Last Modified मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (14:43 IST)
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ

शिवगडच्या डोंगरावर जंगलात मंगळवारी सकाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग झाले आहे.या अपघातात एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे,तर दोन क्रू मेंबर गंभीर जखमी झाले आहेत.एका वैमानिकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू -काश्मीर पोलिसांच्या मते, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि संपूर्ण परिसरात धूर पसरला. या अपघातात वैमानिक आणि सह-वैमानिक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे.तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमनदलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर लष्कराचे असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे कारण परिसरात मुसळधार पाऊस आणि धुके असल्याचे सांगितले जात आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.या घटनेत दोन वैमानिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जखमी वैमानिकांपैकी एकाला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान,घटनास्थळी पोहोचलेली लष्कराची टीम हेलिकॉप्टरचा ढिगारा एकत्र करण्यात लागली आहे. हे हेलिकॉप्टर कोसळले की आपत्कालीन लँडिंग केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेलिकॉप्टर कोसळताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले.त्यांनी जखमी पायलट आणि सह-पायलटला हेलिकॉप्टरमधून बाहेर काढले.दरम्यान,लष्कर बचाव दल आणि पोलिसही घटनास्थळी पोहोचले.दोन्ही जखमींना उधमपूर कमांड रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
कोविडनंतर आता जगाला मंकीपॉक्स व्हायरसचा धोका आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने इशारा ...

विज पडल्याने 33 जणांचा मृत्यू, पीएम मोदींनी शोक व्यक्त केले

विज पडल्याने 33 जणांचा मृत्यू, पीएम मोदींनी शोक व्यक्त केले
बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वादळ आणि वीज पडून 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

हवेतच विमानाचे इंजिन बंद

हवेतच विमानाचे इंजिन बंद
शुक्रवारी एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने ...

हैदराबाद चकमक बनावट होती, पोलिसांवर खुनाचा गुन्हा

हैदराबाद चकमक बनावट होती, पोलिसांवर खुनाचा गुन्हा
हैदराबादमध्ये 2019 मध्ये, एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या 4 आरोपींना ...

सपाचे ज्येष्ठ नेते आझम खानची 814दिवसांनंतर तुरुंगातून सुटका

सपाचे ज्येष्ठ नेते आझम खानची 814दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
आजम खान 27 महिन्यांनंतर सीतापूर कारागृहातून बाहेर आले आहेत. काल म्हणजेच 19 मे रोजी ...