बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मे 2018 (15:50 IST)

दोन मुलांची आई १५ वर्षाच्या मुलासोबत पळाली

दिल्लीतल्या गुरूग्राममध्ये पंधरा वर्षीय मुलाबरोबर दोन मुलांची आई असलेली २६ वर्षीय महिला पळून गेली आहे. ही महिला व अल्पवयीन मुलगा एका टेंट हाऊसमध्ये काम करत होते. तसेच ते एकाच कॉलनीतही राहत होते. त्या दोघांत चांगली मैत्री होती. यावरून दोघांच्या घरात वादही होत असतं. यामुळे रोज रोजच्या वादाला कंटाळूनच ते पळून गेले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही दहा दिवसांच्या अंतराने पळाले आहेत. महिला १२ एप्रिलपासून गायब असून मुलगा २२ एप्रिलला घराबाहेर गेला तो परतलाच नाही.
 

 महिला पती व चार वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षाच्या मुलीबरोबर शीतला कॉलोनीत राहत होती. त्याच कॉलनीत एक पंधरा वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मिळेल ते काम करुन तो कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावत होता. त्याच दरम्यान त्याला एका टेंट हाऊसमध्ये काम मिळाले. तेथे एका विवाहित महिलेशी त्याची ओळख झाली. ती त्याच्याच कॉलनीत राहत असल्याने दोघे एकत्र कामावर जायचे. दिवसागणिक त्यांच्यातील जवळीकही वाढली. यामुळे लोकं त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवू लागले होते.