मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2017 (11:41 IST)

आलिशान ‘अँटिलिया’ इमारतीत आग, कुठलीही हानी नाही

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या आलिशान ‘अँटिलिया’ इमारतीत आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. 

अँटिलियाच्या टेरेसवर आग लागली होती. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग विझवण्यात यश आलं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असलेल्या मुकेश अंबानी यांची अँटिलिया ही 27 मजली इमारत दक्षिण मुंबईत अल्टामाऊंट रोडवर आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उंच आहे. लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसनंतर अँटिलिया ही कदाचित जगातील दुसरी सर्वात महागडी रहिवासी इमारत आहे. याची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये इतकी आहे.