गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (17:01 IST)

निर्भयाच्या आईने मानले राहुल गांधी यांचे आभार

दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला.  याप्रकरणातील निर्भयाचा भाऊ आता पायलट बनला आहे. यासाठी निर्भयाची आई आशा देवी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत.

“निर्भयाचा भाऊ पायलट आहे तर तो केवळ राहुल गांधी यांच्यामुळेच,” असं आशा देवी म्हणाल्या.आशा देवी यांनी सांगितलं की, “त्या दुर्दैवी घटनेनंतर निर्भयाचं कुटुंब पूर्णत: खचलं होतं. पण तिच्या भावाचं अभ्यासावरुन लक्ष विचलित झालं नाही. राहुल गांधींनी केवळ त्याच्या शिक्षणासाठीच मदत केली नाही तर त्याला सातत्याने फोन करुन प्रोत्साहनही दिलं ” असं आशा देवी यांनी सांगितलं आहे.