चोरलेला कुत्रा शिजवून खाल्ला
गुडगाव- एक विकृत घटना समोर आली आहे ज्यात एक तरूणाने आपल्या मित्रांसोबत मिळून एका कुत्र्याचं अपहरण केले आणि नंतर त्याला मारुन खाल्लं. कुत्र्याच्या मालकिणीने पीपल फॉर अॅनिमल्सकडे यासंबंधी तक्रार नोंदवली आहे. नंतर पोलिसांनातरुणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पीएफएहून मिळालेल्या माहितीनुसार 23 एप्रिल रोजी एक महिला तिच्या ब्राऊनी नावाच्या कुत्र्याची चोरी झाल्याची तक्रार करायला आली होती. त्या दरम्यान संपूर्ण परिसरात कुत्र्याचे पोस्टर्स लावून माहिती देणार्यास इनाम देण्यात येईल अशी घोषणाही केली होती. नंतर दोन लोकांनी येऊन सांगितलं की त्या कुत्र्याचं एक तरुण आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण करून त्याला मारुन टाकलं.
तरुणांनी कुत्र्याचं मांस शिजवून खाल्लं असल्याचा आरोप आहे. तसेच आरोपींचा याबद्दल बोलतानाचा व्हिडीओही समोर आला आहे ज्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपासाला सुरुवात केली आहे.