प्रियांका चोप्राचा समावेश फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली (पॉवरफुल) महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. या यादीत प्रियांकासह 5 भारतीय महिलांचे नाव आघाडीवर आहे. प्रियांकाचे रँकिंग 97 वे आहे. भारतीय महिलांपैकी सर्वात चांगले रँकिंग चंदा कोचर यांचे आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.