मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (16:09 IST)

वायनाड भूस्खलन: प्रियंका गांधी मोदी सरकारवर आरोप करित म्हणाल्या पीडितांना केंद्रीय आर्थिक मदत मिळाली नाही

priyanka gandhi
Priyanka Gandhi News : केरळ सरकारनंतर आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही केंद्रातील मोदी सरकारवर भूस्खलनग्रस्त वायनाडला आर्थिक मदत न केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा संसदीय मतदारसंघ वायनाडला अजून केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळालेली नाही, असा आरोप त्यांनी मंगळवारी केला. संसद संकुलात पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने वायनाडबाबत त्यांचा कृती आराखडा काय आहे ते सांगावे.
 
मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका गांधी नुकत्याच झालेल्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या, त्यानंतर त्या वायनाडमधून लोकसभा खासदार म्हणून संसदेत पोहोचल्या आहे. वायनाडच्या खासदार म्हणून प्रियंका यांनी अलीकडेच भाऊ आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत येथे पहिली भेट दिली.
 
याआधी केरळ सरकारनेही वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत न दिल्याने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मदत आणि पुनर्वसनासाठी राज्याला किती रक्कम द्यावी याबद्दल केंद्राकडून अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. गेल्या रविवारी केरळच्या एका मंत्र्याने सांगितले की, केरळ सरकारने भूस्खलनाची सर्व माहिती दिली आहे, परंतु या आकडेवारीत काही चूक आहे की नाही याबद्दल केंद्र सरकारने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.

Edited By- Dhanashri Naik