मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मे 2017 (17:18 IST)

सचिनने घेतली नरेंद्र मोदी यांची भेट

sachin and modi

आगामी ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’बद्दल पंतप्रधानांना सांगितलं आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असं ट्वीट मास्टरब्लास्टरने केलं आहे.‘जो खेले वही खिले,’ हा प्रेरणादायी संदेश पंतप्रधानांनी या भेटीत दिल्याचंही सचिनने सांगितलं. यासाठी त्याने मोदींचे आभारही मानले.दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही सचिनसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. सचिन तेंडुलकरसोबत चांगला वेळ घालवला. त्याचा जीवन प्रवास आणि कामगिरी 125 कोटी भारतीयांसाठी अभिमानस्पद आणि प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ येत्या 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स एर्स्किन यांनी केलं आहे. या सिनेमात सचिनसह त्याची पत्नी, मुलगी, वीरेंद्र सहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत.