शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 22 एप्रिल 2017 (10:05 IST)

हॉटेलमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज देणे बंधनकारक नाही

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणे आता बंधनकारक असणार नाही. केंद्र सरकारनं याबाबतच्या नियमांना मंजुरी दिली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत सर्व्हिस चार्ज घेतला जातो. सरकारने सर्व्हिस चार्जमधून ही सूट दिलेली असली तरी ग्राहकांना सर्व्हिस टॅक्‍समधून मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.
 
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण वेटरला त्याने दिलेल्या सर्व्हिस बद्दल टीप म्हणून ठराविक रक्कम देतो. काही हॉटेलमध्ये मात्र टीप घ्यायच्या ऐवजी बिलामध्येच सर्व्हिस चार्जची रक्कम जमा केली जाते. बिलामध्येच समाविष्ट केलेली सर्व्हिस चार्जची रक्कम हॉटेलनेच ठरवलेली असते.