सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (12:37 IST)

धक्कादायक ! सोनीपत:सिंघू सीमेवर शेतकऱ्याचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला, पोलीस तपास करत आहे

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, बुधवारी सिंघू सीमेवर निदर्शनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे त्या परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरप्रीत सिंग असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो पंजाबच्या फतेहगढ साहिबच्या अमरोह तहसीलमधील रुडकी गावाचा रहिवासी होता.
 
गुरप्रीत सिंह बीकेयू सिद्धपूरशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेले नाही. कुंडली पोलीस ठाणे दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.