शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (13:18 IST)

बहिणाला बुडतांना वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू

Death
झारखंड मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दामोदर नदी मध्ये एका कटुंबातील तीन मुलींचा बुडून मृत्यू झालेला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार झारखंड मधील रामगढ जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील तीन बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे. अंघोळीसाठी नदीवर गेलेली एक मुलगी पाण्यात बुडू लागली, तिला वाचवण्यासाठी दोन बहिणी पाण्यात गेल्या, पण तिघी बहिणी भोवऱ्यामध्ये अडकल्या व तिन्ही बहिणी नदीत बुडाल्या. 
 
ग्रामस्थांनी या तिघी बहिणींना नदीतून बाहेर काढले. व तातडीने रुग्णालयात दाखल केले.पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच रामगढ पोलीस अधिकारी या घटनेची चौकशी करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik