बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (10:10 IST)

चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा - नितीन गडकरी

nitin gadkari
जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल त्याला 1000 रुपये दंड लावण्यात येईल. त्याचवेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्या व्यक्तीला 500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
 
यासाठी लवकरच कायदा आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
 
देशात अनेक शहरांमध्ये कार पार्किंगविषयी नागरिकांना शिस्त नसलेल्या प्रवृत्तीविरोधात नवीन कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं नितीन गडकरींनी यावेळी सांगितलं.