तीस्ता सेटलवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Last Updated: शनिवार, 2 जुलै 2022 (19:04 IST)
अहमदाबाद मेट्रोपॉलिटन कोर्टाने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड आणि आरबी श्रीकुमार यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलिसांनी दोघांचा रिमांड वाढवण्याची मागणी केली नव्हती. पोलिसांनी या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती केली होती. गुजरात एटीएसनं या दोघांना ताब्यात घेतलं होतं.

तुरुंगात दंगलींचे आरोपी आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे, असं तीस्ता यांनी न्यायालयाला सांगितलं. कोर्ट थोड्या वेळात त्यांच्या सुरक्षेबाबत टिप्पणी करणार आहे.
श्रीकुमार यांनी आपलं वक्तव्य दंडसंहिता कलम 164च्या अंतर्गत नोंदवण्यात यावं असं म्हटलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तीस्ता सेटलवाड यांना त्यांच्या मुंबईतील घरातून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

एनजीओशी संबंधित एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं होतं.

तिस्ता सेटलवाड यांना रविवारी (26 जून) वैद्यकीय तपासणीसाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात नेण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेनंतर त्यांनी दावा केलाय की त्यांना झालेली 'अटक' बेकायदेशीर असून त्यांच्या जीवाला धोका आहे.

2002 च्या गुजरात दंगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर 63 जणांना एसआयटीने दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (24 जून) फेटाळून लावली.

अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकूण 69 जणांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात नरेंद्र मोदी आणि इतर कथित गुन्हेगारांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) क्लीन चिट दिली होती. या संदर्भात पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी एहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया जाफरी यांनी केली होती.

झकिया जाफरी यांच्या या कायदेशीर लढाईत तीस्ता सेटलवाड सहयाचिकाकर्ता आहेत.

झकिया जाफरी यांच्या तक्रारीमागे तीस्ता सेटलवाड यांचा हस्तक्षेप असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांचं म्हणणं आहे.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Vinayak Mete Last Rites: आज शासकीय इतमामात होणार ...

Vinayak Mete Last Rites: आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य विनायक मेटे यांच्या ...

Independence Day 2022: Google विशेष डूडलद्वारे भारताचे ...

Independence Day 2022: Google विशेष डूडलद्वारे भारताचे स्वातंत्र्य साजरे करत आहे
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे आणि ...

Rajasthan:रामदेवराकडे जाणाऱ्या 10 भाविकांना ट्रेलरने ...

Rajasthan:रामदेवराकडे जाणाऱ्या 10 भाविकांना ट्रेलरने त्यांना टक्कर मारली, 5 जण ठार, इतरांची प्रकृती चिंताजनक
राजस्थानमधील जोधपूर विभागातील पाली जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात ...

independence day : 'आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती, त्यानंतर ...

independence day : 'आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती, त्यानंतर कुणीही आम्हाला ओळख देत नाही'
अमोल लंगर, श्रीकांत बंगाळे "आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती. 16 ऑगस्टपासून तुम्ही ओळख देऊ ...

75th independence day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृतासाठी ...

75th independence day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृतासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा 'पंच प्राण'
भारत सोमवारी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल ...