1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 17 जुलै 2019 (09:53 IST)

दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात जैशचा दहशतवादी

Terror trap of Delhi Police
पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा एक सदस्य दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. बशीर अहमद असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. जवळपास पाच वर्षांपासून तो सुरक्षा आणि तपास यंत्रणांना गुंगारा देत होता.
 
दिल्लीत 2007 मध्ये एक चकमक घडली. त्यावेळी जम्मू-काश्‍मीरचा रहिवासी असणाऱ्या अहमद याच्या समवेत अब्दुल गफूर या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्या दहशतवाद्यांविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत खटला चालवण्यात आला. विशेष न्यायालयाने 2013 मध्ये अहमदला आरोपमुक्त केले.