सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (07:53 IST)

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद पत्रकाराचा मृत्यू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी डोकं वर काढलं असून त्यांनी छत्तीसगड दंतेवाडा - अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात पोलीस व  नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची मोठी घटना घडलीय. तर हल्ल्यातील गोळीबारात दूरदर्शनच्या पत्रकार कॅमेरामनला गोळी लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोरखनाथ बघेल यांनी या हल्ल्याची चौकशी करत आहेत. पोलीस रुद्रप्रताप व दूरदर्शनचा कॅमेरामन अचुत्यानंद साहू यांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दूरदर्शनच्या कॅमेरामनचा गोळीबारात मृत्यू झाल्याच्या बातमीस खरी असल्याचे सांगितले आहे. हा सर्व प्रकार आता पोलीस   लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.