विद्यार्थिनीला महिला शिक्षकाने बेदम मारहाण केली
खरं तर शिक्षक आणि विद्यार्थीच नाते वेगळेच आहे. उत्तराखंड राज्यातील पौडी जिल्ह्यात गुरुराम राय इंटर कॉलेज मध्ये महिला शिक्षकाने विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये महिला शिक्षिका एका मुलीचा गळा दाबत आहे. आणि तिला बेदम मारहाण करत आहे. सध्या उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात गुरुराम राय इंटर कॉलेजात एनएसएसचे शिवीर लागले असून जेवून भांडी न घासल्यामुळे महिला शिक्षिका चिडून रागाच्या भरात येऊन एका विद्यार्थिनीचा गळा दाबून तिला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ एका व्यक्तीने काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ नेटकरी तीव्र प्रतिक्रिया देत आहे. शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी लोक करत आहे.
एकीकडे शासन मुलींना शाळेत पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे काही शिक्षक त्यांच्यासोबत गैरवर्तन करून, मारहाण करून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. मात्र, हे प्रकरण आता जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे, जेणेकरून आरोपी शिक्षकावर कारवाई करता येईल.
Edited by - Priya Dixit