ऐतिहासिक विधेयक लोकसभेत मंजूर
‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक’ गुरुवारी लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकामधील काही तरतुदींवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर त्यात बदल सुचवण्यात आले होते. मात्र, हे बदल सदस्यांचे मतदानाद्वारे पूर्णपणे नाकारले. त्यामुळे अखेर हे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
तरतुदींमध्ये आपण सुचवलेल्या बदलांवर लोकसभा सदस्यांचे मतदान घेण्यात यावे अशी मागणी ओवैसी यांनी केली होती. मात्र, सदस्यांनी त्यांचा हा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला. मतदानादरम्यान, एका संशोधनात्मक प्रस्तावावर ओवैसी यांच्या बाजूने केवळ २ मते पडली. तर त्यांच्या विरोधात २४१ मते पडली. दुसऱ्या एका बदलाबाबत त्यांच्या बाजूने पुन्हा २ मते पडली. तर २४२ सदस्यांनी त्यांच्याविरोधात मतदान केले. मात्र, यापूर्वीच ओवैसी यांचा संशोधन प्रस्ताव लोकसभा सदस्यांनी आवाजी मतदानाने फेटाळून लावला होता. यापूर्वी या विधेयकावर लोकसभेत विस्तृत चर्चा झाली होती.