बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 6 मार्च 2022 (13:07 IST)

जवानांचा साथीदारांवर गोळीवर, 5 ठार, अनेक जखमी

अमृतसरमधील बीएसएफच्या मेसमध्ये एका जवानाने गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलसह सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) पाच जवान शहीद झाले. रविवारी 6 मार्च रोजी ही घटना घडली. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या चार बीएसएफ जवानांचे मृतदेह रुग्णालयात पोहोचले आहेत. या घटनेत इतर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
 
गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वत:वरही गोळी झाडली होती. सुतप्पा असे या मयत जवानाचे नाव असून तो महाराष्ट्राचा रहिवासी होता. सुतप्पाला  गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सर्व जखमींना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने गोळी झाडली तो बीएसएफचा जवान असून जास्त कामाचा तणाव असल्यामुळे सुतप्पा अस्वस्थ झाले. त्याचे कामावरून एका अधिकाऱ्याशी वाद झाले होते. 
 
रविवारी सकाळी त्याने आपल्या रायफलने गोळीबार सुरू केला. गोळीबारानंतर मेसमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक जखमी झाले. यानंतर दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. बाकीच्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
 
गोळीबारानंतर सुतप्पाने स्वतःवर गोळी झाडली. बीएसएफचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी  पाठवले आहेत. जखमींच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे