तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याने हिंदी कविता वाचली नाही, शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस
Tamil Nadu News : तामिळनाडूतील चेन्नई येथील एका खाजगी शाळेत हिंदी कविता न म्हटल्याबद्दल तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने संबंधित हिंदी शिक्षकाला निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना चेन्नईतील येथील एका खाजगी शाळेत घडली. पीडित विद्यार्थी तिसरीच्या वर्गात शिकतो. शाळेचे संचालक म्हणाले की त्यांनी अद्याप या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी केलेली नाही परंतु सोमवारी अहवाल प्रसिद्ध केला जाईल.
पालकांच्या तक्रारीनंतर कारवाई
विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले आहे की, शिक्षकाने मुलाला हिंदी कविता न म्हटल्यास शाळेत प्रवेश देणार नाही अशी धमकीही दिली होती. तक्रार मिळाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करत शिक्षकाला निलंबित केले.