मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2024 (10:00 IST)

व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या

murder knief
व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी यांचे वडील जितन साहनी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. जीतन साहनी यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला.रात्री उशिरा गुन्हेगारांनी घरात घुसून मुकेश साहनी यांच्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्ल्यावेळी त्याचे वडील झोपले होते. मुकेश साहनी हे बिहारमधील प्रमुख व्हीआयपी पक्षाचे अध्यक्ष आहेत.सदर प्रकरण दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपूर भागातील आहे. ही घटना रात्रीच्या वेळेस घडली. 
 
पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि तपास सुरु केला.प्रथमदर्शनी हे हत्येचे प्रकरण आहे. मयत जितन साहनी हे घरात झोपले होते. यावेळी चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली.घटनेच्या वेळी मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी घरात एकटेच होते. बिरौल पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. 

Edited by - Priya Dixit