काय सांगता, डॉक्टरांनी किडनी स्टोन ऐवजी चक्क किडनीचं काढली,निष्काळजीपणा केल्यामुळे रुग्णालयावर दंड
वैद्यकीय निष्काळजीपणाशी संबंधित एक गंभीर प्रकरण गुजरातमधील बालासीनोरमधून समोर आले आहे. केएमजी जनरल हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनच्या उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची शस्त्र क्रिया करण्यात आली किडनीतील स्टोन काढण्यासाठी ही शस्त्र क्रिया केली .पण डॉक्टरांनी रुग्णाच्या किडनी स्टोनच्या ऐवजी चक्क किडनीचं काढली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, खेडा जिल्ह्यातील वांगरोली गावातील रहिवासी देवेंद्रभाई रावल यांनी केएमजी जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर शिवूभाई पटेल यांच्याशी संपर्क साधला होता. रावल यांनी सांगितले होते की त्यांना पाठीत तीव्र वेदना होत आहेत आणि लघवी करताना त्रास होत आहे. मे 2011 मध्ये, त्याच्या डाव्या मूत्रपिंडात 14 मिमी चा स्टोन असल्याचे उघड झाले. रावल यांना चांगल्या उपचारासाठी चांगल्या ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु त्यांनी त्याच रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे योग्य मानले. 3 सप्टेंबर 2011 रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या शस्त्रक्रियेनंतर त्यांची किडनी काढावी लागणार असे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकल्यावर रावल कुटुंब चकित झाले.डॉक्टरांनी किडनी काढली. नंतर चार महिन्यानंतर त्यांना लघवीला त्रास होऊ लागला आणि प्रकृती खालावली त्यांना अहमदाबादच्या आयकेडीआरसी मध्ये नेण्यात आले 8 जानेवरी 2012 रोजी रावल यांचे निधन झाले.
या प्रकरणाबाबत रावलच्या कुटुंबीयांनी नडियाडमधील ग्राहक तक्रार निवारण आयोग गाठले. 2012 मध्ये आयोगाने हॉस्पिटल आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला 11.23 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
या प्रकरणावर कडक कारवाई करत गुजरात राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने रुग्णालयाला 11 लाखांहून अधिक दंड ठोठावला आहे.