1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 26 जून 2020 (17:41 IST)

OMG! 30 वर्षांनंतर ती महिला नव्हे तर पुरुष आहे कळलं

कोलकाता- पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात 30 वर्षीय एक विवाहित महिलेच्या पोटातील खालील भागात वेदना होत असल्याची तक्रारीनंतर रुग्णालयात गेल्यावर माहीत पडले की ती वास्तविकेत पुरुष असून तिच्या अंडकोषाचा कर्करोग आहे.
 
महिला मागील नऊ वर्षांपासून विवाहित आहे आणि काही महिन्यापासून तिच्या पोटात वेदना होत होत्या म्हणून ती शहरातील नेताजी सुभाष चंद्र बोस रुग्णालयात गेली होती. येथे डॉ. अनुपम दत्ता आणि डॉ सोमण दास द्वारे चिकित्सकीय परीक्षण केल्यावर महिलेची 'खरी ओळख' समोर आली.
 
डॉ दत्ता यांनी सांगितले की दिसायला ती महिला सारखी आहे. तिचा आवाज, स्तन, सामान्य जननांग इतर सर्व काही महिलेप्रमाणे आहे. तसं तर तिच्या जन्मापासूनच तिच्या शरीरात गर्भाशय आणि अंडाशय नाही. तिला कधी मासिक पाळी आली नाही. त्यांनी म्हटले की ही एक दुर्लभ स्थिती असून सहसा 22,000 लोकांपैकी एकात आढळते. 
 
आश्चर्याची बाब म्हणजे महिलेच्या 28 वर्षीय बहिणीच्या तपासणीमध्ये देखील हीच स्थिती दिसून आली, ज्यात व्यक्ती जेनेटिकली पुरुष आणि शरीराची बाह्य अवयव महिलेप्रमाणे असतात. 
 
डॉ दत्ता यांनी म्हटले की त्या महिलेवर केमोथेरपी केली जात असून तिची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी म्हटले की एका स्त्रीप्रमाणे मोठी झाली आणि एका पुरुषासोबत सुमारे एक दशक वैवाहिक जीवन जगत आहे. सध्या आम्ही रुग्ण आणि तिच्या पतीची काउंसलिंग करत आहोत आणि समजविण्याचा प्रयत्न करत आहोत की पुढे देखील ते सामान्य प्रकारे आपलं आविष्य जगू शकतील. 
 
डॉक्टरांनी म्हटले की रुग्णाच्या दोन इतर नातेवाइकांमध्ये देखील भूतकाळात या प्रकाराची समस्या होती म्हणून ही एक जनुक समस्या असल्याचे दिसते.