रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 डिसेंबर 2024 (19:10 IST)

तरुणाची तरुणीवर गोळी झाडून आत्महत्या

death
यूपीमधील संभलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 22 वर्षीय मुलाने प्रेयसीवर गोळी झाडली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी झाली.

यूपीच्या संभलमध्ये एका तरुणाने तरुणीवर गोळी झाडून आत्महत्या केली. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुण आणि तरुणी हे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, सध्या गोळीबारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

हे संपूर्ण प्रकरण असमोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरथाळा गावातील आहे. शनिवारी येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.  मृत तरुणाचे नाव 22 वर्षीय गौरव असे असून तो शेजारील अमरोहा जिल्ह्यातील राहणारा आहे. घटनास्थळी ज्या शस्त्राने ही घटना घडली ते शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून सर्व वस्तुस्थिती तपासण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. 
Edited By - Priya Dixit