मान्यताला कारणे दाखवा नोटीस
सुपरस्टार संजय दत्तची पत्नी मान्यताला पणजी जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.आपण गोव्याच्या रहिवासी असल्याचा दावा मान्यताने केला आहे, आणि काही दिवसांपूर्वी संजय दत्तशी विवाह करताना मान्यताने काही कागदपत्रं विवाह नोंदणी कार्यालयात जमा केली आहेत, ती बनावट असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या कारणांसाठीच पणजी जिल्हा प्रशासनाने मान्यताला नोटीस बजावली असून, चुकीचा पत्ता दिल्याबद्दल तिला नोटीस बजावण्यात आले आहे.