शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (14:47 IST)

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय ७

श्रीगणेशायनमः ॥ नमोदेवीविश्वरूपिणी ॥ शोभसीनामरूपेंकरूनी ॥ अव्यक्तचिदत्‍नाचीखाणी ॥ वर्णितांवणीथोटावें ॥१॥
सहस्त्रनामाचींवसनें ॥ नेसुनीदिससीवरवेंपणें ॥ सहस्त्ररुपाचींभुषणें ॥ लेवूनीमिरविसीजगांत ॥२॥
शंकरम्हणेमुनीनायका ॥ यापरीरघुनाथेंअंबिका ॥ पुप्पसंबारमेळवुनी निका ॥ सहस्त्रनामंनापिंजूलीं ॥३॥
दंडवतपृथ्वीवर ॥ रामेंकेलानमस्कार ॥ चरणवंदोनीवारंवार ॥ प्रदक्षणाकरीतसे ॥४॥
श्रीरामेंकेलीजीपूजा ॥ तीआवडीनेंस्वीकारींश्रीतुळजा ॥ संतोषलीअष्टभुजा ॥ परमकल्याणीजगदंबा ॥५॥
मगश्रीरामलक्ष्मण ॥ यादोघांसाअसनीबैसवून ॥ योगिनीसहिताआपण ॥ निराजंनकरितसे ॥६॥
उभयबंधुसओवाळुन ॥ श्रीरामासीबोलेंवचन ॥ पूर्वजन्मीमांझेंदर्शन ॥ इच्छिलें होतेंत्वांपुत्रा ॥७॥
तेम्यांदिधलेंतुजदर्शन ॥ आतांआणिकहीवरदेइन ॥ जेणेंदुःखजायनिरसून ॥ सुखाअत्यंतपावशी ॥८॥
तेथुननदुरदक्षिणदेशीं ॥ लक्ष्मणसहितजायवेगेंसी ॥ ऋष्यमुख्यपर्वतनामज्यासी ॥ चतुःशृंगीशोभती ॥९॥
तेथेंचपंपानामकसरोवर ॥ विस्तीर्ण असेनिर्मळनीर ॥ ज्यामाजींविकसीतकल्हार ॥ कमलशतपत्रेंशोभतीं ॥१०॥
त्यासरोवराच्यातीरीं ॥ लक्ष्मणासहितजायझडकरी ॥ वृक्षछायापाहुनीवरी ॥ तेथेंस्थिरराहेतु ॥११॥
तेथेंसुग्रीववानरनाथ ॥ तुजपाहूनघेऊलबहुत ॥ मगहुनमानअंजनीसुत त्यासएकांतकरील ॥१२॥
म्हणेलपाहेरेमारुती ॥ तेदोघेवीरकोणअसती ॥ त्यासी पाहुनमजलाभीती ॥ बहुवटतयेसमयी ॥१३॥
माझाबंधुवाळीबळवंत ॥ त्यानेंपाठविलेंयासीनिश्चित ॥ माझाकरावयाघात ॥ ऐसेंवाटतमजलागीं ॥१४॥
तरीतुंसुक्ष्मरुपधरोन ॥ त्यासमीपजायत्वरेंकरुन ॥ कांतेआले असतांजाण ॥ समजूनघेईभावत्यांचा ॥१५॥
श्रीअंबाम्हणेरामासर्वज्ञ ॥ सुग्रीवाचीऐसी आज्ञा ॥ होताचीहनुमानमहाप्राज्ञा ॥ तुम्हींजवळीयेईल ॥१६॥
तोवदेलतुम्हासीवचन ॥ तुम्ही कोण कुणाचेनंदन ॥ कायतुमचेंनामाभिधान ॥ कोणतोदेशतुमचा ॥१७॥
तुमचे अंगीराजाचिन्ह ॥ दिसतें वीर्यशौर्यलक्ष्मण ॥ आजानबाहुधैर्यर्यसदगुण ॥ किमर्थवनवासतुम्हासी ॥१८॥
ऐसाबोळेलकपीश्वर ॥ मगतुम्हीद्यावेंत्यासीउत्तम ॥ अयोध्येचारशरथनृपवर ॥ त्याचेकुमराआम्हीदोघे ॥१९॥
रामामझिंनामाभिधान ॥ हाबंधूमाझालक्ष्मण ॥ सीताभार्यासवेंघेऊन ॥ वनासी आलोंपितृवचनें ॥२०॥
अगस्ती मुनीची आज्ञापाळुन ॥ पंचवटींराहिलोंबहुदिन ॥ रावणतेथेंकपटकरुन ॥ सीतेसीघेउनपळाला ॥२१॥
तिसीशीधावयाजाण ॥ येथेंआलोंदोघेजण ॥ तूंकोणकुणाचापुत्रसुजन ॥ संत्यसांग आम्हासी ॥२२॥
अनुग्रहायोग्याआहेसी ॥ ऐसेंबोलतूंत्याकपीसी ॥ मगतोसांगेलतुजसी ॥ सर्ववृतांताअपुला ॥२३॥
म्हणेलमीवायूचानंदन ॥ हनुमाननामबहुबलवान ॥ सुग्रीवाचाआहेंप्रधान ॥ वानरजातिरुपमाझें ॥२४॥
याऋष्यमुकागिरीवर ॥ आहेसुग्रीववानरेश्वर ॥ सवेंप्रधानपांचवानर ॥ भयातुरराहतसे ॥२५॥
सुग्रीवाचाजेष्ठबंधु ॥ महाबलपराक्रमसिंधु ॥ बाळीवानरराजाप्र सिध्दु ॥ किष्किंधेचाअधिपती ॥२६॥
त्यानेंसुग्रीवासीद्वेषकरुन ॥ याचीभार्याघेतलीहिरोन ॥ धावला याचाध्यावयाप्राण ॥ मगहापळलातेथुनी ॥२७॥
सुग्रीवजिकडेपळतजाय ॥ वाळीतिकडेधांवताहोय ॥ ऋष्यमुखपर्वतींनिर्भय ॥ होऊन महिलासुग्रीव ॥२८॥
पूर्वंयापर्वतींमतंगऋषी ॥ तपकरितसेअहनिशीं ॥ बाळीनेंविघ्नकेलेंत्यासी ॥ म्हणोनी ऋषींनेंशापिलें ॥२९॥
जरयेथेंबाळीयेईल ॥ तात्काळप्राणाईमुकेल ॥ यास्तववाळीनेंहेंस्थळ ॥ वर्जिलेंअसेजाणपां ॥३०॥
सर्वत्राआहेवाळींचेंभय ॥ सुग्रीवयेथेंराहिलानिर्भय ॥ तोतुझामित्रहोऊनी कार्य ॥ तुझेंसर्वहीकरील ॥३१॥
अंबाम्हणेश्रीरामासी ॥ ऐसाबोलेलमारुतीतुजसी ॥ त्याहीउत्तर द्यावेंत्यासी ॥ माझेंव चनेंकरुनी ॥३२॥
पुढीलकर्याचेगौरव ॥ जाणोनीत्वाबोलावेंसर्व ॥ कोठेंआहेतोसुग्रीव ॥ कैसाहोइलमित्रमाझा ॥३३॥
कैसेंमाझेंकार्यकरील ॥ हेंऐकोनीतुझेबोल ॥ मगमारुती उत्तरदेइल ॥ तेंऐकतूंसद्भावें ॥३४॥
म्हणेलनलनीलजांबुवंत ॥ चौथादधिमुखाविख्यात ॥ पांववामी हनुमंत ॥ आहोंतप्रधानजयाचे ॥३५॥
तोसुग्रीववानरेश्वर ॥ आहेयाचपर्वतावर ॥ तुझीइच्छाअसेलजर ॥ तरीभेटविनतुजलागीं ॥३६॥
श्रीरामातुझेंकार्यसर्व ॥ तेकरीलनिश्चयेंसुग्रीव ॥ त्वांहीत्याचेंकार्यसर्व ॥ आधींकेलेंपाहिजे ॥३७॥
ऐसेंबोलेलमारुती ॥ त्वांकार्यकरीनम्हणावेंत्याप्रती ॥ जाय आतांसुग्रीवाप्रती ॥ घेउनीयेईकप्येंद्रा ॥३८॥
मगतोसुग्रीवाकडेजाईल ॥ सर्ववृत्तातत्यासीकथील ॥ तात्काळवानरांसहयेईल ॥ सुग्रीवतुझ्यादर्शन ॥३९॥
मग अग्नीसीसाक्षठेऊन ॥ परस्परवचनप्रणाम ॥ एकमेकांचेकार्यपुर्ण ॥ एकमेंकानेंकरावें ॥४०॥
ऐसेंवचनबोलून ॥ एकमेखाआलिंगुन ॥ पूर्ववृत्ताअपुलालेंपुर्ण ॥ एकमेकासी सांगावे ॥४१॥
श्रीरामाससांगितल्यापरी ॥ सुग्रीवासीसख्यकरी ॥ कार्यसिद्धिहोईलबरी ॥ संकट काहींनपडेल ॥४२॥
त्वांकिष्किंधेसीजाऊन ॥ एकबाणेबाळीसमारुन ॥ किष्किंधेचेंराज्यअर्पण ॥ सुग्रीवासीकरावें ॥४३॥
सुग्रीवभार्यारुमाचाण ॥ वालीनेंघेतसीजीहिरोन तीसुग्रीवासीदुऊन ॥ सुखसंपन्नकरावें ॥४४॥
मगतोसुग्रीववानरेश्वर ॥ आणवीलपृथ्वीचेंसर्ववानर ॥ सीतेसीशोधावयासत्वर ॥ पाठविलदशदिशा ॥४५॥
हनुमानलंकेसीजाईल ॥ अशोकवनींसीतेसीभेटेल ॥ लंकाजाळुनीपुन्हां येईल ॥ समुद्रतरोनीतुजजवळी ॥४६॥
मगत्वांहीरामावानरासहित ॥ जावेंक्षारसमुद्रापर्यंत ॥ तेथें राहुनसेतुत्वरित ॥ वानराहातींबाधांवा ॥४७॥
सेतूमार्गेलंकेसीजावें ॥ रणींरावणसीवधावें ॥ विभीषणाराज्यद्यावें ॥ अंगिकारावेंसीतेसी ॥४८॥
सीताभार्यासवेंघेऊन ॥ पुष्पकविमानींबैसोन ॥ याच मार्गानेंयेऊन ॥ अयोध्येसीजासील ॥४९॥
अंबाम्हणेश्रीरामासी ॥ तुज कर्तव्यतेंकथिलेंतुजसी ॥ येथेंलिंगस्थापनवेगेंसी ॥ आपुलेंनामेंकरावें ॥५०॥
आपुलेंनामेंकरून ॥ लक्ष्मणेकरावेंलिंगस्थापन ॥ तुझ्यानामरेंमतीर्थम्हणुन ॥ पावनविख्यातहोईल ॥५१॥
रामेश्वरलक्ष्मणेश्वर ॥ हेंलिंगद्वयाचेंनाम निर्धार ॥ जोंवरीधराचंद्रभास्कर ॥ अलिप्तमहिमातोंवरी ॥५२॥
माझेतुझेंलक्ष्मणाचें ॥ सांनिध्ययेथें असावेंसाचे ॥ दर्शनमात्रेंप्राणियाचे ॥ दोषजातीलसर्वथा ॥५३॥
अंबाम्हणेरामात्वाचें ॥ उत्तम स्तोत्रकेलेंमाझे ॥ यासीपठणकरतीलमानवजे ॥ सावधजेश्रवणकरतील ॥५४॥
त्यांचेघरींसर्वसंपत्ती ॥ अष्टमहासिद्धिनांदती ॥ माझे आज्ञेनेंअंतीं ॥ माझेंलोकासीजातील ॥५५॥
अष्टमीनवमीचतुर्दशी ॥ कृष्णपक्षाच्यात्यादिवशीं ॥ होऊनीजितेंद्रियउपवासी ॥ शतवारपठणकरावें ॥५६॥
त्याचेंदशांश करावेंहवन ॥ धर्वेधृताचेअवदान ॥ बहुतकुमारीसीद्यावेंभोजन ॥ घृतशर्करापायसान्नें ॥५७॥
ऐसें करीलजोनर ॥ त्यासीवाक्यार्थानिर्धार ॥ होईलतत्त्वसाक्षात्कार ॥ कृतकृत्यतोहोय ॥५८॥
लोकानुग्रह इच्छेकरुन ॥ तुजसहितयापर्वतींराहिन ॥ छपन्नचौकडायुगाच्यापूर्ण ॥ दीनजनतारावया ॥५९॥
तुझ्यातीर्थीकरुनीस्नान ॥ तुझींलिंगाचेंकरतीलपुजन ॥ देवऋषीपितृयजन ॥ जेकरतीलसद्भावें ॥६०॥
मनुष्यासीअन्नदान ॥ पशूसीतृनजीवन ॥ तेंवैकुंठासीजातीलजाण ॥ संशययेथेंनकरावा ॥६१॥
आतांयेथूनदक्षिणदेशीं ॥ जयरामातूंवेगेंसी ॥ कृतकृत्यहोऊननिश्रयेंसी ॥ माझ्यादर्शनायेसील ॥६२॥
शंकरम्हणतीवारिष्ठालागुन ॥ जगदंबेचेंआज्ञावचन ॥ श्रीरामेकरुनश्रवण ॥ लक्ष्मणासहिततेधवां ॥६३॥
श्रीरामेंस्थापिलारामेश्वर ॥ लक्ष्मणानेलक्ष्मणेश्वर ॥ स्थापुनीकेलानमस्कार ॥ जगदंबेसीदोघांनीं ॥६४॥
लिंगस्थापिलेंजाणोनी ॥ त्वरितारामवरदायिनी ॥ रामलक्ष्मणासेवेंघेवोनी ॥ सत्वरतेथोनीनिघाली ॥६५॥
रामतीर्थाचेदाक्षिणप्रदेशीं ॥ यमुनाचलाचेशिरोभगासी ॥ शीलाविस्तीर्णपाहुनीअवेसी ॥ त्यावरीबैसलीजगदंबा ॥६६॥
बिअसोनियांशिळेवर ॥ रामासीबोलतीझालीमधुर ॥ त्यासेहीळेसीसर्वहीनर ॥ घाटशीळम्हणतीअजुनी ॥६७॥
तुळजाम्हणेश्रीरामासीबरवें ॥ याचमार्गानेंतुम्हींजावें ॥ शत्रुसीसमरांगनींतुम्हींमारावें ॥ अव्याहत करावीनिज आज्ञा ॥६८॥
विजयीहौनीपरिपूर्ण ॥ पुन्हांयामार्गेयेऊन ॥ याचस्थळींव्हविंदर्शन ॥ तुझेंमजला रामराया ॥६९॥
जेथेंजेथेंसमरांगनीं ॥ संकटपडेलयेईलरलानी ॥ तेथेंतेथेंमजलागुनी ॥ स्मरावेंत्वांरामराया ॥७०॥
स्मरतांचसंकटनिरसेल ॥ ग्लानीजाउनबळयेईल ॥ विजयलक्ष्मीमाळ्याघालील ॥ सत्यजाणरघुराया ॥७१॥
तूंजातासतांवनाप्रतीं ॥ निर्विघ्नमार्गहोवोतनिश्चिती ॥ ऐसीजगदंबारामाप्रती \॥ बोलतीझालीकॄपेनें ॥७२॥
शंकरम्हणतीवरिष्ठमुनी ॥ रामेंदेवींचेंवचनाऐकोणी ॥ देवीसीनमस्कारकरोनी ॥ प्रदक्षघातली ॥७३॥
देवीचा आधिर्वादघेउन ॥ सत्वरनिघालेरघुनंदन ॥ लंकेचामार्गलक्षुन ॥ चरणचालीचालतसे ॥७४॥
श्रीरामामार्गीचालत ॥ अंबाउभीत्याकडेपहात ॥ नेत्रटकळीलावूनीनिश्चित ॥ दिसेतोवरीपहातसे ॥७५॥
बहुदुरश्रीरामगेला ॥ मगदिसेनासाझाला ॥ देवीपरतोनराहवयाला ॥ स्थलशोधितउत्तम ॥७६॥
त्यारम्यपर्वतावरी ॥ रामतीर्थाचेदक्षिणशेजारी ॥ स्थळयोजूनीभुवनसूंदरी ॥ निवासकरितीझाली ॥७७॥
पुढेंजहोईलरम्यचरित्र ॥ जगदंबेचेंपरमपवित्र ॥ तीर्थराजयेथेंश्रोत्र ॥ सुस्त्रातहोतीलश्रोतीयांचे ॥७८॥
व्यवहारघुळीनेंमलालीवाणी ॥ जेव्हांप्रक्षालीनकथाजीवनी ॥ पवित्रमान्यहोईलजनीं ॥ पांडुरंगजनार्दनदासतेव्हां ॥७९॥
इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडे ॥ तुरजामहात्मे ॥ शंकरवरिष्ठसंवादेसप्तमो व्यायः ॥७॥
श्रीजदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥