शनिवार, 20 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

अॅपलकडून व्हॉटसअॅप स्टिकर अॅपवर बंदी

whats app sticker not allowed on iphone
सध्या सर्वजण व्हॉटसअॅप स्टिकर मोठ्या प्रमाणात वापरतांना दिसत आहेत. मात्र  आयफोन युजर्ससाठी मात्र एक बॅडन्युज आहे. सध्या लोकप्रिय झालेले व्हॉटसअॅप स्टिकर अॅप मात्र आयफोन युजर्सना वापरता येणार नाही.

अॅपल कंपनीनं या अॅपवर बंदी घातली आहे. आता यामागे फेसबुकचा वाद नसून नियम भंग केल्याने अॅपलनं हे अॅप अॅप स्टोअरमधून काढून टाकले आहे. स्टीकर फिचर आल्यानंतर थर्डपार्टी कंपन्यांनी हे अॅप प्लेस्टोअर आणि अॅप स्टोअरवर आणले. त्यामुळे युजर्सनी स्टिकर अॅप मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड देखील केले. शिवाय स्वत:चा फोटो वापरून स्टिकर देखील तयार करता येतो. त्यामुळे त्याला जास्त पसंती मिळाली. पण नियमांचं उल्लंघन केल्यानं अॅपस्टोअरवरून स्टिकर अॅप हटवण्यात आले आहे.

WABetaInfoनं याबाबतची माहिती दिली आहे. यावर व्हाट्सअॅपने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र फेसबुक आणि अॅपलचे सीईओंमध्ये झालेल्या वादानंतर हे पाऊल उचललं गेल्याची शक्यता आहे.