सीईटी अर्ज भरण्याची मुदत अखेर वाढवली
इंजिनियरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणार्या एमटी-सीईटीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया बारावीची परीक्षा संपल्यानंतरही किमान आठवडाभर सुरू ठेवण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने निश्चित केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात अर्ज भरण्याचा त्रास वाचणार आहे. यंदा एमटी-सीईटीची सर्व प्रक्रिया डीटीई तर्फे पार पाडली जाणार आहे. त्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. बारावी सायन्स शाखेचा अखेरचा पेपर 26 मार्चला आहे. त्यानंतर किमान आठवडाभर म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरायची मुदत मिळेल.