परिक्षा तोंडावर आली असताना पालकांनी काय करावं व काय करू नये याविषयी थोडंस....
1 - सकाळी उठल्या बरोबर "परिक्षा तोंडावर आली आहे आणि यांना झोपा सुचताहेत" असं म्हणू नये.
2 - चहा नाश्ता झाल्याबरोबर लगेच "चला आवरा आता, कालची रिव्हीजन करा" असं म्हणणं टाळावं.
3 - जेवताना अभ्यासाचा विषय टाळावा. शेजारचा मुलगा/मुलगी किती वाजता ऊठतो/ऊठते हे वारंवार सांगू नये.
4 - लावलेल्या ट्यूशन क्लासच्या फी चा आकडा, आई-वडीलांनी घेतलेले कष्ट हे दिवसभर ऊठता-बसता सांगू नये.
5 - मुलगा/ मुलगी टिव्ही समोर थोड्या वेळ बसल्यास त्यांच्यासमोर डोळे मोठे करून येरझाऱ्या घालू नयेत.
6 - मुलाला/मुलीला रात्री अभ्यास करताना झोप येत असल्यास "मी दहावीत/बारावीत असताना पहाटे तीन वाजेपर्यंत अभ्यास करत होतो" असं खोटं सांगू नये.
7 - थोडा वेळ मुलांनी मोबाईल हातात घेतला तर हिसकावून घेऊ नये.
8 - दिवसभर अभ्यासाचा जप टाळावा.
काय करावे....
1- सर्वप्रथम शांत रहाण्याची प्रॅक्टीस करावी.
2 - मुलांच्या आवडीचा स्वैपाक करावा.
3 - मुलं अभ्यास करताना थोडं सोबत बसावं. (आपलं व्हाँटस्अँप बाजूला ठेवून)
4 - अधून मधून प्रेमाने "मला माहीत आहे, तू यशस्वी होणारच" किंवा "काळजी करू नकोस, मी तूझ्या सोबत आहे" असं म्हणावं.
5 - अभ्यासाच्या मध्ये गंमतीजंमती सांगून वातावरण हलकं-फुलकं ठेवावं.
6 - एखादा पेपर कठिण गेल्यास त्यावर चर्चा करत न बसता पुढच्या पेपरच्या तयारीला लागावं.
7 - परिक्षा संपल्यानंतर आपण कशी मज्जा करणार आहोत याची स्वप्न रंगवावीत.
8 - सरतेशेवटी "हर बच्चे की अलग रफ्तार होती है" हे लक्षात ठेवावं. दहावी/बारावी ची परिक्षा हा आयुष्याचा एक टप्पा आहे, आयुष्य नाही हे लक्षात ठेवावं.