रविवार, 4 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2024 (20:43 IST)

दहावी बारावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून सुरु

10th 12th supplementary examination
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा उद्या 16 जुलै पासून सुरु होणार आहे. 

या बाबतची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.त्या म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नाशिक कोकण, लातूर या नऊ विभागात मंडळातर्फे 10 वी ची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 
आणि 12 वी पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. 

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी 28 हजाराहून अधिक विद्यार्थांनी नोंदणी केली आहे. या मध्ये 20 हजार मुले आणि 8 हजार मुलींचा समावेश आहे. तसेच या मध्ये एक ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 
तर बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी 28 हजार 976 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये 36 हजार मुले आणि 8 हजार 605 मुलींचा समावेश आहे. 
 
विद्यार्थ्यांना सकाळी 10:30 वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहावे. 11 वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाणार. दुपारच्या सत्रात दुपारी अडीच वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दालनात उपस्थित राहावे. दुपारी 3 वाजता  प्रश्न पत्रिकेचे वाटप केले जाणार. 

फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये परीक्षेसाठी यंदा पेपरच्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे वाढवून देण्यात आली होती. त्याच प्रमाणे या पुरवणी परीक्षेत देखील 10 मिनिटे निर्धारित वेळेपेक्षा वाढवून मिळणार आहे. तसेच पुरवणी परीक्षेत प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत मूल्यमापन व श्रेणी परीक्षेचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जाणार आहे. 

Edited by - Priya Dixit