पुण्यात कंपनीला भीषण आग  
					
										
                                       
                  
                  				  पुण्यातील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमधील कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम सुरू आहे.
				  													
						
																							
									  
	 
	पुण्यातील सिंहगड रोड जवळील भाऊ इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
				  				  
	 
	मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत एक स्फोट झाल्यानंतर आग लागली. नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये.