बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 10 जुलै 2021 (10:22 IST)

अ‍ॅश बार्टी प्रथमच विम्बल्डन फायनलमध्ये पोहोचली,व्यावसायिक क्रिकेटचा देखील एक भाग होती

या जगातील पहिल्या क्रमांकाची ऑस्ट्रेलियातील टेनिस पटू अ‍ॅश बार्टीने  प्रथमच विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी अंतिम सामन्यात बार्टीचा सामना चेक गणराज्याची कॅरोलिना पिलिस्कोव्हाशी होणार आहे.2019 मध्ये फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अ‍ॅश बार्टीचे लक्ष तिच्या पहिल्या विंबलडन जेतेपद वर असणार आहे.
 
उपांत्य सामन्यात या स्टार खेळाडूने माजी चॅम्पियन अँजेलिक कर्बरला सरळ सेटमध्ये पराभूत केले.कर्बरला बार्टीने 6-3,7-6 (3) ने पराभूत केले आणि अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले.
 
 
क्रिकेटवर विशेष प्रेम
 
आज जगभरात अ‍ॅश बार्टीचे लाखो चाहते आहेत,परंतु टेनिसबरोबरच तिने व्यावसायिक क्रिकेट देखील खेळले आहे हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. अ‍ॅश बार्टीने महिला बिग बॅश लीगमध्ये तिच्या क्रिकेटींग प्रतिभेचा नमुना सादर केला आहे.
 
बार्टीने वयाच्या 15 व्या वर्षी व्यावसायिक टेनिस खेळण्यास सुरुवात केली, परंतु 2011 मध्ये विम्बल्डनमध्ये पदार्पण केले. पण 2014 मध्ये तिने टेनिस मधून ब्रेक घेतला आणि क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वयाच्या 19व्या वर्षी तिने क्वीन्सलँड संघाबरोबर प्रशिक्षण सुरू केले. नंतर तिने ब्रिस्बेन हीटबरोबर महिला बिग बॅश लीग करार केला.
 
 
फलंदाजीत फ्लॉप झाली 
 
 
बार्टीने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती पण त्यातील तिची कामगिरी खूपच खराब होती. 2015- 2016च्या महिला बिग बॅश हंगामात तिला 9 टी -20सामने खेळण्याची संधी मिळाली परंतु 11.33च्या सामान्य सरासरीने केवळ 68 धावा बघायला मिळाल्या.
त्यानंतर तिने क्रिकेटपासून अंतर राखले आणि पुन्हा एकदा महिला डबल्स सह टेनिस कारकीर्दीला सुरुवात केली.
 
 
2011मध्ये ज्युनियर विम्बल्डन जेतेपद जिंकले
 
2011 साली अ‍ॅश बार्टीने ज्युनियर विम्बल्डन स्पर्धा जिंकली. पण त्यानंतर, आजारी असल्याने तिने दोन वर्ष टेनिसमधून अंतर ठेवले.
नुकत्याच दिलेल्या निवेदनात ती म्हणाली की, "माझ्या कारकीर्दीत अनेक चढ-उतार होते, परंतु मी एक दिवस किंवा एका क्षणासाठीही माझा मार्ग बदलला नाही."