गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (12:23 IST)

चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

चिखलीच्या नेवाळे वस्ती येथे चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर एका 12 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . या बाबत पीडित मुलीच्या आईने  चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी 12 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे वस्ती, चिखली येथे राहणारी पीडित मुलगी आपापल्या आई वडिलांसोबत राहत होती. ही मुलगी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाकडे खेळायला गेली असता तिथे असलेल्या 12 वर्षीय मुलाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पोलीस तपास करत आहे.